Share

IPL Auction 2023 | अजिंक्य रहाणेला मिळाले द्विशतक झळकावण्याचे बक्षीस, एमएस धोनीच्या CSK ने घेतले विकत

Published On: 

IPL Auction 2023 | नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सने आपला संघ मजबूत करण्याच्या उद्देशाने आयपीएल 2023 च्या लिलावात प्रवेश केला. त्यांनी प्रथम अनुभवी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेला संघात घेतले. चेन्नईने रहाणेला ५० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले. रहाणेला केकेआरने रिलीज केले.

आयपीएल 2023 साठी लिलाव सुरू झाला आहे.10 संघांचे मालक आणि प्रशिक्षक कर्मचारी कोची येथील हॉटेल ग्रँड हयात येथे उपस्थित आहेत. एकूण 67 जागेसाठी लिलाव होणार आहे. लिलावापूर्वी सर्वाधिक चर्चा इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, सॅम कॅरेन आणि कॅमेरून ग्रीन यांच्याबद्दल आहे. यंदाच्या मोसमात या तिन्ही अष्टपैलू खेळाडूंवर मोठी बोली लागणार असल्याचे मानले जात आहे.

चेन्नईचा संघ आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. सीएसकेने 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले. 10 पराभवांचा सामना केल्यानंतर, हा संघ गुणतालिकेत 9व्या स्थानावर होता. चेन्नईने आयपीएल लिलावापूर्वी ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा आणि ख्रिस जॉर्डन या अनुभवी खेळाडूंना रिलीज केले. या संघाने 18 खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवले. ज्यामध्ये कर्णधार धोनी व्यतिरिक्त रवींद्र जडेजा, मोईन अली यांसारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!