🕒 1 min read
रत्नागिरी : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजे यांची आता माघार झाली असली तरी, अद्यापही तो विषय संपलेला नाही. राजेंची अपक्ष उमेदवार म्हणून दावेदारी, इतर पक्षांचं राजेंना न मिळालेलं सहकार्य, शिवसेनेचं पक्ष प्रवेशाची अट, राजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारणे, शिवसेनेने आपला अधिकृत उमेदवार जाहीर करणे या सर्व घडामोडी नंतर आता चारही प्रमुख पक्षांकडून आपापले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, असे असले तरी आता या संदर्भात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
“छत्रपती संभाजीराजेंचा घात कोणी केला हे सर्व जनतेला माहीत आहे. राजेंनी स्वतः सांगितलं की, शिवसेनेने माझा घात केला. तसेच राजेंना राष्ट्रपती कोट्यातून जागा देऊन त्यांचा यथोचित सन्मान आम्ही केला होता. आता जो उमेदवार आम्ही दिला आहे तो पक्षाच्या ध्येय धोरणानुसार रीतसर उमेदवार दिला आहे,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.
तसेच आमचा पक्ष हा परिवारवादी नाही, असा खोचक टोला ही त्यांनी लगावला. तसेच महाराष्ट्रातलं आघाडी सरकार हे सर्वच स्तरावर अपयशी ठरलेलं सरकार आहे, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
