Share

पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? सुप्रिया सुळे म्हणाल्या..

Published On: 

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. ‘यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडू दे, महागाईपासून दिलासा मिळू दे, शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळू दे’, असं साकडं त्यांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी घातलं. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खरंतर आपल्याला काय मिळाले, याबद्दल देवळात आभार मानण्यासाठी येत असते. देवळात येऊन काही मागू नये जे काही दिलंय ते आशिर्वाद समजून आभार मानायला यावं. सगळे कार्यकर्ते आणि पंडित काहीतरी मागा म्हणत होते. त्यावेळी राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीचं राज्य येऊ दे. अडचणीत आलेला देशातला शेतकरी त्याला आनंद मिळू दे, असं साकडं घातलं, असं सुळे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?

सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी जरा वेगळाच प्रश्न विचारला. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री कधी मिळेल? तुम्हाला पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला आ आवडेल का? असा प्रश्न पत्रकारांना त्यांना विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याचं उत्तर माझ्याकडे नाहीये, मी काही जोतिषी नाही. मी मुख्यमंत्री व्हावं याबद्दल कधी विचार केला नाही. या प्रश्नाचं उत्तर जनता आहे. याचा निर्णय जनताच घेईल’, असे त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!