🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये गुजरात टायटन्सने पहिल्याच वर्षी चॅम्पियन बनून सर्वांना आश्चर्यचकित केले. यापूर्वी २००८मध्ये आयपीएल सुरू झाली तेव्हा राजस्थान रॉयल्सने पदार्पणातच विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. आता हार्दिक पंड्याच्या संघाने राजस्थानलाच हरवून इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये जल्लोष केल्यानंतर आता गुजरातच्या संघाने रोड शो केला आहे.
अहमदाबादमध्ये गुजरात संघाने बसमधून आयपीएल ट्रॉफीसह हा रोड शो केला. कर्णधार हार्दिक पंड्या, प्रशिक्षक कर्मचारी आणि व्यवस्थापनाशी संबंधित सदस्यांसह गुजरात टायटन्स संघाचे खेळाडू डबल डेकर बसमधून अहमदाबादमध्ये फिरले. गुजरात संघाचा रोड शो उस्मानपुरा ते रिव्हरफ्रंटच्या विश्वकुंज असा आहे. या रोड शोच्या माध्यमातून गुजरात संघाने आपल्या चाहत्यांसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
https://www.instagram.com/p/CeLrnb2pdy2/
Whatta #RoadShow it is from @gujarat_titans Absolutely Thrilled. #AavaDe Ahmedabad Gujarat @hardikpandya7 @rashidkhan_19 I still not got the tshirt but next year for sure???? pic.twitter.com/3byHE66S4p
— Yash joshi (@imyashj) May 30, 2022
Gujarat Titans on the fantastic road show in Ahmedabad.
What a start of season by all team members#GujaratTitans #IPLFinal #roadshow @gujarat_titans @IPL pic.twitter.com/x87goin4Kc— Himanshu Ladha (@HimanshuLadha8) May 30, 2022
असा रंगला सामना…
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्या हंगामात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले आहे. सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) ७ गड्यांनी मात दिली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकात ९ बाद १३० धावा केल्या. हार्दिक पंड्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तिघांना बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी सावध आणि संयमी फलंदाजी केली. १९व्या षटकात गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
