औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळ एक महिला जनशताब्दी रेल्वे समोर अचानकपणे आली, रेल्वे चालकाला ही महिला पाचशे मीटर पर्यंत दिसून आल्याने, रेल्वे चालकाने प्रेशर हॉर्न वाजल्याने ही महिला रेल्वे पटरीवर झोपून गेली. यानंतर जे घडल ते कौतुकास्पदच म्हणावं लागेल.
एक महिला जनशताब्दी रेल्वे समोर अचानकपणे आली, यावेळी रेल्वे चालकाने सतर्कपणा दाखवत रेल्वे पहिलीच्या समोर थांबवली. यामुळे महिलेचे प्राण वाचले असून रेल्वे चालकाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना समाज माध्यमांवरती दिसत आहे. ही घटना चिकलठाणा औरंगाबाद दरम्यान मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळ आज सकाळी घडली, रेल्वेच्या ताशी 100 चा वेग अवघ्या 500 मीटर लाच थाबविण्यात चालकास यश मिळाले आहे. इंजिन सह चार डब्बे पुढे जाऊन रेल्वे थाबविण्यात आले.
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/571886257705605/
इंजिनच्या प्रेशर हॉर्न मुळे अनपेक्षित महिला रेल्वे पटरी वर झोपली होती. जनशताब्दी 13 मिनिट यामुळे घटनास्थळी थांबून राहिली व पुढे औरंगाबादकडे रवाना झाली. जनशताब्दी एक्सप्रेसचे मुख्य चालक अमितसिंग, सहचालक धीरज थोरात यांची सतर्कता रेल्वे प्रशासनाने घेतली असून रेल्वे चालकांचा लवकरच सत्कार केला जाणार आहे. रेल्वे चालकाच्या सतर्कपणामुळे आज एका महिलेचे प्राण वाचले असून रेल्वे चालकाचे मोठे कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या –


