Share

IPL 2022 : आशीष नेहरानं घडवला इतिहास! आयपीएलमध्ये “अशी” कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय प्रशिक्षक

Published On: 

मुंबई : आयपीएलचा १५वा हंगाम अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. यंदाच्या हंगामामध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत खेळला होता. लीग टप्प्यात अव्वल स्थानावर असलेल्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध सहज विजय नोंदवला. या विजयात प्रशिक्षक आशीष नेहराचा मोठा वाटा होता. आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासोबतच त्याने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.

आयपीएलच्या मागील १४ हंगामात आजपर्यंत कोणत्याही भारतीय प्रशिक्षक असलेल्या संघाला आयपीएल ट्रॉफी मिळवता आली नाही. या वर्षी म्हणजेच १५व्या हंगामात लखनऊ आणि गुजरात या दोन नवीन संघांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. हे दोघेही भारतीय दिग्गजांच्या देखरेखीखाली या स्पर्धेत उतरले होते. माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्समध्ये मार्गदर्शक म्हणून सामील झाला, तर आशीष नेहराला गुजरात टायटन्सने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.

गेल्या १४ हंगामात आयपीएल ट्रॉफी मिळविणाऱ्या संघाला विदेशी प्रशिक्षक होते, पण गुजरात हा पहिला संघ ठरला आहे ज्याने भारतीय प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली या आयपीएल विजेतेपदावर कब्जा केला आहे. आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आशीष नेहरा हा पहिला भारतीय प्रशिक्षक ठरला आहे. यापूर्वी चार वेळा स्टीफन फ्लेमिंग (चेन्नई सुपर किंग्स), तीन वेळा महेला जयवर्धने (मुंबई इंडियन्स) यांनी आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. ट्रेव्हर बेलिस (कोलकाता नाईट रायडर्स) मुख्य प्रशिक्षक म्हणून, संघाने दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली तर टॉम मूडी, रिकी पाँटिंग, जॉन राइट, डॅरेन लेहमन आणि शेन वॉर्न यांनी संघाला प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवून दिले.

यंदाच्या हंगामात साखळी फेरीत गुजरात संघाने १४ पैकी केवळ ४ सामने गमावले. या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर असताना प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला होता. राजस्थान विरुद्ध गुजरातने क्वालिफायर १ जिंकून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. अंतिम सामन्यात राजस्थान संघ पुन्हा एकदा गुजरातसमोर होता आणि येथेही गुजरातने बाजी मारली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!