Share

Russia vs Ukraine war: युरोपियन युनिअनमध्ये सामील होण्याचा युक्रेनचा अर्ज मान्य

Published On: 

नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू आहे. रशियाचे लष्कर जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे. मात्र युक्रेनचे लष्कर रशियाच्या लष्करासमोर तग धरून राहील एवढयाही ताकदीचे नाहीये. परंतु तरी युक्रेनचे लष्कर रशियाच्या बलाढ्य लष्कराशी जमेल तसा सामना करत आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यातून जस जशी मदत मिळेल तस तस युक्रेन रशियाशी सामना करत आहे. मध्यंतरी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपियन युनिअनमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला युरोपीय युनिअनच्या संसदेकडून मान्यता मिळाली आहे. रशियाने केलेल्या बलाढ्य आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने युरोपियन युनिअनमध्ये सामील होणे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.युरोपियन युनिअनने विनाविलंब युक्रेनला युनियनचा सदस्य व्हायला मंजुरी दिली आहे.

युरोपियन युनिअन ही संस्था लष्करी आघाडी नसली तरी ; युक्रेनची आर्थिक बाजू भक्कम ठेवायला युरोपियन युनिअनची नक्कीच मदत होणार आहे.युरोपियन युनिअनमध्ये सध्या २७ सदस्य आहेत. युरोप खंडात पर्यायाने जगात शांतता प्रस्थापीत करणे, आर्थिक आणि राजकीय एकता निर्माण करणे ही युरोपियन युनिअनची प्रमुख ध्येय धोरणे आहेत. ऑस्ट्रिया, बेल्जीअम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, चेक- रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रांस, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली इत्यादी महत्वाचे देश युरोपियन युनिअनचे सदस्य आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!