नाशिक : मंगळवारी नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पवारांच्या मेहरबानीवर तुमचे (उद्धव ठाकरे) सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, असा दावा राणे यांनी केला.
नारायण राणे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त टीका करतात, टोमणे मारतात. मंत्रालयात जात नाहीत, मराठी तरुण उध्वस्त होत आहेत. तसेच संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री होणार आहेत.”
राज्यपाल चुकू शकत नाहीत –
याबरोबरच राज्यपाल यांनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याबद्दल राणे म्हणाले आहेत कि, राज्यपाल चुकू शकत नाहीत. मी भाषण पहिले नाही, पाहून याबद्दल नक्कीच प्रतिक्रिया देऊ. दिशा सलियन प्रकरणावर राणे म्हणाले, दिशाची आम्ही बदनामी केली नाही, दिशा कुटुंबाने आमचे आभार मानायला हवे.
महत्वाच्या बातम्या :


