मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लवासा प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयाने लवासा प्रकरणात पवार कुटुंबावर ठपका ठेवला. या प्रकरणी आशिष शेलार यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहेत. ही राष्ट्रीय संपत्तीची लुट असून यामध्ये पवार कुटुंबांचा भाग आहे, असा गंभीर आरोप केला आहे.
याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले आहे. यासोबत शेलार यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. तसेच मलिक हटाव देश बचाव या अभियानाची माहिती देखील शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लवासा ही संकल्पना शरद पवारांची आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचे व्यक्तिगत स्वारस्य आहे. व कर्तव्य निभावताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निष्काळजीपणा केला. शेतकऱ्यांच्या जमिनीचे विषय अजूनही प्रलंबित असल्याचे शेलार यांनी सांगितले. या विषयाकडे सरकारचे लक्ष आहे का? असा प्रश्न करत आदित्य ठाकरे यांनी या संबंधित भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
आडनाव बघून सरकार निर्णय घेते का?
याआधी संजय राठोड यांच्यावर आरोप असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर यापेक्षा जास्त आरोप झाले आहेत. तरी देखील यांचा राजीनामा घेण्यात येत नाही. एकीकडे संभाजी राजे उपोषणाला बसले त्यावेळी सरकारने यांच्या तब्येतीकडे लक्ष दिले नाही आणि दुसरीकडे नवाब मलिक यांच्या औषधोपचारवर लक्ष दिले जाते. यावरून आडनाव बघून सरकार निर्णय घेते का? असा सवाल शेलार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
