Share

‘हे’ आहेत कसोटी पदार्पणात सर्वात जास्त धावा करणारे भारतीय फलंदाज

Published On: 

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक फलंदाजांनी जबरदस्त खेळ्या करत बऱ्याच धावांचा रतीब घातला आहे. परंतु जेव्हा एखादा खेळाडू आपल्या पदार्पण सामन्यात मोठी खेळी करतो. किंवा शतक ठोकतो. तेव्हा त्याच्यासाठी तो एक अविस्मरणीय क्षण असतो. आजपर्यंत असे बरेच खेळाडू झाले आहेत. ज्यांनी पदार्पण सामन्यात शतक झळकावले आहे.

पाहायला गेल तर असा कारनामा करणारे बरेच खेळाडू आहेत. परंतु आम्ही अशा ३ भारतीय फलंदाजांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी कसोटी पदार्पण सामन्यात धावांचा रतीब घातला आहे.

कसोटी पदार्पण सामन्यात सर्वात जास्त धावा करणारे ३ भारतीय फलंदाज

शिखर धवन

भारताकडून कसोटी पदार्पण सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम हा शिखर धवनच्या नावावर आहे. शिखरने १४ मार्च २०१३ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात पहिल्या डावात त्याने १८७ धावांची जबरदस्त खेळी केली. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला होता. शिखरने आतापर्यंत ३४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७ शतक आणि ५ अर्धशतकांच्या मदतीने २३१५ धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा धाकड सलामी फलंदाज कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने ६ नोहेंबर २०१३ ला कोलकाता येथे वेस्ट इंडीजविरुद्द आपला कसोटी पदार्पण सामना खेळला. त्याने आपल्या पहील्याच डावात जबरदस्त शतक ठोकत १७७ धावा कुटल्या होत्या. त्याने आतापर्यंत एकूण ३९ सामन्यांसह ६६ डावात २६७९ धावा केल्या आहेत. त्याची २१२ हि सर्वोत्तम धावसंख्या आहे.

लाला अमरनाथ

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ते म्हणजे माजी भारतीय दिग्गज खेळाडू लाला अमरनाथ, त्यांनी १५ डिसेंबर १९३३ रोजी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कसोटी पदार्पण केले होते. त्या सामन्यात अमरनाथ यांनी दोन्ही डावात मिळून १५६ धावा केल्या. त्यांनी पहिल्या डावात ३८ तर दुसऱ्या डावात ११८ धावांचा पाऊस पाडला होता. लाला अमरनाथ यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत २४ सामन्यांत एकूण ८७८ धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!