🕒 1 min read
मुंबई : सध्या युरोपात युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) या संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाच्या बलाढ्य लष्करासमोर युक्रेनचा टिकाव लागणे अवघड आहे. तरी युक्रेन आपल्या आपल्या परीने रशियाच्या आक्रमणाविरुद्ध लढा देत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगातील सर्वच देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या फटका बसला आहे.भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनच्या विविध शहरात शिक्षण घ्यायला आणि नोकरी करायला गेले आहेत. रशियाच्या आक्रमणामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्येच अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ ऑपरेशन गंगा’ सुरु केले आहे.
अनेक भारतीय या ऑपरेशन अंतर्गत परत भारतात देखील आले आहेत. मात्र काही विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. इतर देशांनी युक्रेनमधून आपले नागरिक परत आणायची प्रक्रिया आधीच सुरु केली आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधून भारतीयांना परत आणायच्या प्रक्रियेस विलंब लावला आहे अशी टीका नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांनी केली आहे.
त्यातच आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. बाहेरच्या देशात जर आपल्या देशातली नागरिक अडचणीत असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणे हे जगातील सर्वच देशांच्या सरकारांचे आद्य कर्तव्य आहे. याचे श्रेय घेण्याचे काहीच कारण नाही. मोदी सध्या जे करत आहेत ; ते श्रेय वादाचे काम आहे. त्यांनी असे करू नये. कुठे कामाचं श्रेय घेतलं पाहिजे आणि कुठे नाही हे लोकांना कळायला पाहिजे अशी टीका बच्चू कडू यांनी आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश; महेश मांजरेकरांना कोर्टाचा दिलासा…
- अखेर पुण्यातील चिमुकलीला न्याय ; नराधमाला फाशीची शिक्षा
- Russia -Ukraine War: युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आता भारतीय वायुदल मैदानात
- Russia vs Ukraine war: कीव्ह शहर त्वरित सोडण्याचे भारतीय दूतावासाचे आदेश
- ‘दाऊदचा माणूस पवारांना चालतो’; निलेश राणेंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
