Share

Russia -Ukraine War: युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आता भारतीय वायुदल मैदानात

Published On: 

नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनने NATO मध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे . युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधील युद्धामुळे जागातील प्रत्येक देशाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या परिणाम भोगावे लागत आहेत.

भारत देश पण त्याला अपवाद नाही. भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनदेशातील विविध शहरात अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा या उपक्रमास सुरुवात केली आहे. युक्रेनमधून जवळपास २००० विद्यार्थी भारत देशात परत आले आहेत.

मात्र रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवल्याने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी आता भारतीय हवाई दल उतरले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भारतीय हवाई दल आता युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना  मायदेशी आणण्यासाठी C-१७ ग्लोब मास्टर पाठवणार आहे. C-१७ ग्लोबमास्टर हे भारतीय हवाईदलाकडचे महाकाय विमान आहे. या महाकाय विमानातून मोठया प्रमाणात माल आणि मनुष्याची वाहतूक करण्यात येत असल्याने अजूनही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यास गती मिळणार आहे. हे विमान उतरण्यासाठी 3500 फूट लांब रनवे लागतो. मात्र, अगदी 1500 फूटांच्या रनवेवरही हे विमान उतरवता येतं. जगात सध्यातरी फक्त अमेरिका , इंग्लंड आणि भारत हे तीनच देश C-१७ ग्लोबमास्टर वापरतात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!