Share

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

Published On: 

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर भारताची कामगिरी शानदार आहे. गेल्या 22 वर्षापासून टीम इंडिया या मैदानावर जिंकत आहे. परंतु या वेळी इंग्लंडचं भाराताला आव्हान असणार आहे,

दरम्यान, भारतीय संघात निवड झालेला अष्टपैलू अक्षर पटेल याला पहिल्या कसोटी सामन्यातील अंतिम ११ जणांच्या पथकात संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र दुखापतीमुळे त्याला खेळण्यापूर्वी संघातून बाहेर जावे लागले आहे.

बीसीसीआयने दिलेल्या ट्विटरद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. अक्षरच्या डाव्या पायाच्या गुडघ्यात वेदना होत असल्याने तो इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अक्षरऐवजी शाहबाज नदिम किंवा राहुल चाहर यांपैकी एकाला संघात संधी दिली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!