Share

IPL 2022:शार्दूल ठाकूरची स्पर्धेआधी मजेशीर पोस्ट; रितिका शर्माने केले ट्रोल

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतात. आधी व्यंकटेश अय्यरने आवेश खानसोबतचा त्याच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला. दुसरीकडे, शार्दुल ठाकूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने एक उत्तम कॅप्शनही दिले आहे. जे पाहिल्यानंतर रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि युजवेंद्र चहल यांनी त्याला ट्रोल केले आहे.

शार्दुल ठाकूरने रोहित शर्मा (rohit sharma) आणि अजिंक्य रहाणेसोबतचा (ajinkya rahane)  एक जुना फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत मजेशीर कॅप्शनही लिहले आहे. या फोटोवरून रोहितची पत्नी रितिका सजदेह (ritika sajdeh) आणि युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) यांनी त्याला ट्रोल केले आहे. शार्दुल ठाकूरने (shardul thakur) शेअर केलेल्या छायाचित्रात एका बाजूला रहाणे तर दुसरीकडे रोहित असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत शार्दुलने लिहिले की, ‘मला वाटते बॉडीगार्ड असणे हा प्रसिद्ध असण्याचा भाग आहे. ‘

 

या फोटोवर रितिकाने कमेंटमध्ये लिहिले की, ‘तुला माहित आहे की काय येत आहे.’ तर चहलने लिहिले की, ‘बॉडीगार्डची बॉडी कुठे आहे ठाकूर साहेब.’ त्याच्या या पोस्टला मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. शार्दुल गेल्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता, या मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!