Share

IPL 2022: ‘घरी नंबर १ कोण?’ चाहत्याच्या प्रश्नाला धोनीचे मजेशीर उत्तर

Published On: 

मुंबई: भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार एमएस धोनी जगभरातील आणि भारतातील त्याच्या बहुतेक चाहत्यांसाठी नंबर १ खेळाडू आहे. ‘थाला’ धोनी चेन्नईमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे धोनी मात्र मैदानाबाहेर स्वतःला नंबर १ मानत नाही. नवीन आयपीएल हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी एका कार्यक्रमात, धोनीने चाहत्यांशी काही ‘वैयक्तिक प्रश्न’ घेऊन संवाद साधला. तेव्हा त्याने याबद्दल सांगितले.

चेन्नई सुपर किंग्सने (CSK)  धोनीचा (MS Dhoni) चाहत्यांसोबत संवादाचा व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात एका चाहत्याने धोनीला घरी नंबर १ कोण आहे असा प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर देताना धोनी हसत म्हणाला, ” मागे वळून पाहिले तर अर्धे लोक अजून हसत आहेत. प्रत्येकाला माहित आहे की घरात पत्नीच नंबर १ असते.” धोनीचे पत्नी साक्षीशी लग्न होऊन आता एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे, या जोडप्याने २०१० मध्ये लग्न केले. साक्षी आणि एमएस धोनी यांना झिवा नावाची मुलगी आहे.

धोनीची बायको साक्षी नेहमी त्याला सपोर्ट करण्यासाठी स्टँड्समध्ये उपस्थित असते. महिला दिनाच्या निमित्ताने चेन्नईने भरवलेल्या एका चर्चा सत्रात तिने क्रिकेटरची बायको असण्यामागील त्रासाबाबत सांगितले होते. तसेच तिने क्रिकेटरचे वैयक्तिक आयुष्य कसे असते याबाबतही सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!