Share

टिकून राहायचे असेल तर भारताच्या ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करणे आवश्यक : रूट

Published On: 

चेन्नई : ५ फेब्रुवारी अखेर आज तो दिवस उजाडला आहे. आजपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. तत्पुर्वी भारतीय नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. परंतु पहिल्या कसोटी सामन्याची प्लेइंग इलेव्हन अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे सर्वांना या सामन्यातील ‘विराटसेना’ कशी असेल?, याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रूटने सामना सुरु होण्यापुर्वीच भीती दर्शवली आहे. इंग्लंडला या मालिकेत यशस्वी व्हायचे असल्यास त्यांनी चेतेश्वर पुजाराला लवकर बाद करणे गरजेचे असल्याचे रूटला वाटते. पुजारामध्ये दीर्घ काळ खेळपट्टीवर राहून मोठ्या धावा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला लवकर बाद करणे आमच्यासाठी महत्वाचे असणार आहे, असे मत रूटने व्यक्त केले.

पुजारा फारच उत्कृष्ट खेळाडू आहे. तो कौंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायर संघाकडून खेळला होता. त्यावेळी मला त्याच्यासोबत काही सामने खेळण्याची संधी मिळाली. मी त्याच्यासोबत आणि त्याच्याविरुद्ध सामने खेळलो आहे. त्याने आमच्याविरुद्ध काही मोठ्या खेळी केल्या आहेत. खेळपट्टीवर दीर्घ काळ टिकून राहण्याची पुजारामध्ये क्षमता आहे. त्यामुळे त्याला लवकर बाद करणे आमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहे, असे रूट म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!