Share

अखेर आज तो दिवस उजाडला ; आजपासून भारतविरुद्ध-इंग्लंड कसोटीला सुरुवात

Published On: 

चेन्नई : अखेर आज तो दिवस उजाडला आहे. (५ फेब्रुवारी) आजपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. तत्पुर्वी भारतीय नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. परंतु पहिल्या कसोटी सामन्याची प्लेइंग इलेव्हन अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे सर्वांना या सामन्यातील ‘विराटसेना’ कशी असेल?, याची उत्सुकता लागली आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिलेल्या माहितीनुसार संघाची सलामी जोडी ठरली आहे. त्यामुळे चेन्नई कसोटीत रोहित शर्मा आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करताना दिसतील. याबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे. आघाडीचे पाचही फलंदाज बाद झाल्यानंतर पंत दमदार कामगिरी करत संघाला चांगला शेवट करून देण्याची क्षमता राखतो. त्यानुसार पंतला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले जाऊ शकते.

अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!