मुंबईः विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून राजकीय वर्तुळात दोन प्रवाह तयार झाले आहेत. भाजपकडून हा चित्रपट टॅक्स-फ्री करा अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, चित्रपट आल्यावर त्यांना काश्मीर आठवला हे. ३२ वर्षांआधी कुठे होते हे लोक? भाजप म्हणाले होते आम्ही पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू. तो कधी भारतात येतोय, त्याची आम्ही वाट पाहत आहोत. काश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असे बाळासाहेब त्याकाळी परखडपणे म्हणाले होते. मात्र, आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरून राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आम्ही “ठाकरे” चित्रपट बनवला. परंतु तो ही टॅक्स फ्री केला नाही. असा टोला देखील राऊतांनी भाजपला लगावला. काश्मीर प्रकरणावर आम्ही कधी राजकारण केले नाही. तेव्हा बाळासाहेब हे पहिले नेते होते, ज्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आणि अतिरेक्यांना सांगितलं कि, अमरनाथ यात्रेकरूंच्या केसालाही धक्का लागला, तर तुमचे हजला जाणारी विमान आम्ही उडू देणार नाही. त्यानंतर अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा नीट पार पडल्या. त्यांनी सातत्याने काश्मिरी पंडितांची बाजू घेतली. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट जर कोणाचा राजकीय अजेंडा बनत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:

