मुंबई : इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) मंगळवारी याची पुष्टी केली. मॉर्गन हा गेल्या वर्षभरापासून तंदुरुस्ती आणि फॉर्मच्या समस्यांशी झुंज देत होता आणि मॉर्गन लवकरच निवृत्तीची घोषणा करेल असे सोमवारी ब्रिटीश माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर वृत्त दिले होते.
३५ वर्षीय मॉर्गनने म्हटले, “सावध विचारविनिमय केल्यानंतर, मी तत्काळ प्रभावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे. हा एक सोपा निर्णय नव्हता, पण मला खात्री आहे की असे करण्याची हीच योग्य वेळ आहे.” मॉर्गनने २०१५ विश्वचषकापूर्वी इंग्लंडची धुरा सांभाळली होती. त्याला अॅलिस्टर कुकच्या जागी मर्यादित षटकांमध्ये संघाचे कर्णधारपद मिळाले. मात्र २०१५च्या विश्वचषकात संघाची कामगिरी चांगली नव्हती. यानंतर त्याने प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांच्यासोबत इंग्लंडचे नशीब बदलण्यासाठी काम केले आणि २०१९मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
It's official – Eoin Morgan, the captain who led England's white-ball revolution, has retired from international cricket ???????? pic.twitter.com/GT5pMSAK0l
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 28, 2022
Eoin Morgan calls it a day, but his legacy and impact on England's limited-overs sides will endure ✌️#ThankYouMorgs pic.twitter.com/334neSXRnq
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 28, 2022
मॉर्गनचा जन्म आयर्लंडमधील डब्लिन येथे झाला. २००६ मध्ये त्याने आयर्लंड संघातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तीन वर्षांनंतर त्याला इंग्लंडच्या टी-२० संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. मॉर्गनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०,८५९ धावा केल्या आहेत. त्याने १६ कसोटी, २४८ एकदिवसीय आणि ११५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. त्याच्या नावावर कसोटीत ७००, एकदिवसीय सामन्यात ७७०१ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४५८ धावा आहेत. त्याने वनडेमध्ये १४ तर कसोटीत २ शतके झळकावली आहेत.
महत्त्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

