मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेला धक्कावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. यानंतर शिवसेनेचा बुलंद आवाज असणारे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस मिळाली होती. जमीन घोटाळाप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आज संजय राऊत हे रायगडमधील अलिबाग येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर जोरदार टोले लगावले आहेत.
संजय राऊत म्हणाले कि, बहुमत आहे ना? मग लपून का बसला आहात? एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला. हिंदूत्वाशी संबध नसलेलेही हे बंडखोरांसोबत पळून गेलेत. बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंबियांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे वाटोळं झालयं असा इतिहास सांगतो. तसेच पुढे ते म्हणाले कि, 22 वर्ष दिघे साहेबांचे विचार आठवले नाहीत का?, ईडी पासून सुटका करुन घेण्यासाठी हे सर्व कट कारस्थान सुरु आहे. आम्हाला हिंदूत्व कुणी शिकवू नये, असं म्हणत राऊतांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
दरम्यान, या नोटीसीनंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले होते. “मला नुकतेच कळले की ईडीने मला समन्स बजावले आहे. चांगले! महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठी लढाई लढत आहोत. मला रोखण्याचे हे षडयंत्र आहे. तुम्ही माझा शिरच्छेद केला तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. मला अटक करा! जय हिंद!”, असे ट्वीट करत थेट इशारा राऊतांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना दिला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

