🕒 1 min read
मुंबई : आज संजय राऊत यांनी रायगडमधील अलिबाग येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. यावेळी बहुमत आहे ना, मग लपून का बसला आहात? हिंदूत्वाशी संबध नसलेलेही हे बंडखोरांसोबत पळून गेलेत. बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंबियांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे वाटोळं झालयं असा इतिहास सांगतो, असं राऊत यावेळी म्हणाले. तर संजय राऊतांनंतर आता बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही भाजपमध्ये विलिनीकरण करणार अशा चर्चा केल्या जात होत्या पण आम्ही भाजपात विलिन झालो का? आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत आणि आमचे नेते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत. संजय राऊत यांच्या विधानामुळेच मोदी आणि ठाकरे यांच्यातील संबंध बिघडले, असा आरोप केसरकारांनी केला. तसेच राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान राखत नाहीत. सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेली आहे. तसेच औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर होऊ शकले नाही, असंही केसरकर म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी 5 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकार बरखास्तीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही उद्धव ठाकरेंची शेवटची मंत्रिमंडळ बैठक आहे का?, या बैठकीत मुख्यमंत्री राजीनाम्याची घोषणा करणार आहेत का? महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू झाल्याच्या आठव्या दिवशी अचानक मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची देखील माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
