मुंबई : मागच्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग जास्त प्रमाणात वाढू लागला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ९१,७९९ वर गेली आहे. यामध्ये जर आपल्याला कोरोनाची लागण झाली तर आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कोरोना पासून आपला बचाव करण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे खूप गरजेचे आहे.
जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यामधून बरे होण्यासाठी तुम्हाला काही विशेष चांगला आहार घेणे खूप गरजेचे आहे. या काळामध्ये काय खावे हे माहीत असणे देखील खूप गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोरोना झाल्यानंतर कोणता आहार घेतला पाहिजे.
कोरोनातून बरे होण्यासाठी काय खावे –
– ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे अशा व्यक्तींनी दररोज सुका मेवा खावा.
– कोरोनातून बरे होण्यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे.
– जवेनामध्ये अंडी चिकन, मासे यांसारख्या प्रथिनेयुक्त गोष्टींचा समावेश करावा.
– शरीराला जीवनसत्व मिळतील अशा भाज्या आणि फळे यांचे सेवन करावे.
– रोज सकाळी संध्याकाळी दुधामध्ये हळद मिसळून प्यावे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

