मुंबई : न्यूझीलंडचा अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात (ENG vs NZ) आपल्या नावावर एक मोठी कामगिरी नोंदवली. विशेष बाब म्हणजे बोल्टने गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीत ही अप्रतिम कामगिरी केली आहे. यासह किवी संघाच्या या वेगवान गोलंदाजाने श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. नॉटिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला बोल्ट १८ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद १६ धावा करून तंबूत परतला.
कसोटी क्रिकेटमध्ये ११व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ट्रेंट बोल्ट सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मुथय्या मुरलीधरनसोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ११व्या क्रमांकावर उतरून बोल्टने आतापर्यंत एकूण ६२३ धावा केल्या आहेत. त्याने ६९ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे तर मुथय्या मुरलीधरनला हा आकडा गाठण्यासाठी ८७ कसोटी सामन्यांचा आधार घ्यावा लागला. या क्रमांकावर जेम्स अँडरसनच्या नावावर ६०९ धावा आहेत तर ग्लेन मॅकग्राच्या नावावर ६०३ धावा आहेत.
Here we go! 17 runs to pass Murali as the highest run scorer at #11 in Men’s test match cricket. Can Mitchell hang on to get Trent Boult to the milestone? #engvnz
— Mel Jones (@meljones_33) June 11, 2022
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान इंग्लंडने १ गडी बाद ९० धावा केल्या होत्या. ऑली पोपने ७३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या, तर सलामीवीर अॅलेक्स लीसने ७७ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. जॅक क्रॉलीला ट्रेंट बोल्टने वैयक्तिक ४ धावांवर बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

