🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs NZ) तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. किवी संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमे (Colin de Grandhomme) टाचेच्या दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड क्रिकेटने याला दुजोरा दिला आहे. ३५ वर्षीय ग्रँडहोमने मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ३.५ षटके टाकली. स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या टाचेला दुखापत झाल्याचे समोर आले. यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना १० जूनपासून नॉटिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे.
पाहुण्या किवी संघाला लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-०अशी आघाडी घेतली आहे. ग्रँडहोमेला दुखापतीतून सावरण्यासाठी १० ते १२ आठवडे लागतील, असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले. पहिल्या कसोटीत हेन्री निकोल्सच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून आलेल्या मायकेल ब्रेसवेलचा ग्रँडहोमेच्या जागी उर्वरित मालिकेसाठी किवी संघात समावेश करण्यात आला आहे.
https://twitter.com/sportstigerapp/status/1534052465498152960
ग्रँडहोमेने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ५० चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. संघाला त्याची नितांत गरज असताना त्याने ही खेळी खेळली. किवी संघाने एकवेळ ३६ धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. यानंतर ग्रँडहोमेच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात १३२ धावा केल्या. पहिल्या डावात ग्रँडहोमेने यजमानांचा माजी कर्णधार जो रूटची महत्त्वाची विकेट घेतली. मात्र, दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना तो दुखापतग्रस्त झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
