Share

Arvind Sawant: “संपर्कात असलेल्या १४ खासदारांची नावे द्या”; अरविंद सावंतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर ४० आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. यानंतरही अनेक कार्यकर्ते तसेच शिवसेनेतील खासदार शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. शिंदे घाटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी या अगोदरही पक्षातील १२ खासदार संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आणखीन २ खासदार संपर्कात आल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. त्याचबरोबर भाजपचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचा दावा केला होता. यानंतर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद सावंत म्हणाले कि, शिवसेनेचे १४ कोणते खासदार शिंदे गटासोबत जाणार आहेत, त्यांची नावे द्या असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. राष्ट्रपती निवडणुकी बाबत उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितलं की मी सर्व खासदारांसोबत चर्चा करून निर्णय घेईल. आज दुपारी खासदारांची बैठक लावली आहे. त्या बैठकीनंतर निर्णय होईल. १४ जणांचा शिवसेना खासदारांचा ग्रुप आहे सांगत आहात तर त्या १४ जणांची नावे आम्हाला द्या ती जाहीर करा, असं आवाहनही अरविंद सावंत यांनी केले.

दरम्यान, यावेळी आज कोर्टानं निर्णय दिला की, विधानसभा अध्यक्षांनी कुठलाही निर्णय घेऊ नये. याचा अर्थ काय? कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?, बेकायदेशीररित्या निर्माण झालेल्या सरकारला याद्वारे एक प्रकारे संरक्षण दिलं जातंय आणि वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळं जर न्यायाला उशीर होत असेल तर त्याचा अर्थ न्याय नाकारला जात आहे. अशा प्रकारे न्यायाला उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षित नाही, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!