🕒 1 min read
मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी म्हटले आहे. आज जयंत पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य करत मोठी घोषणा केली आहे.
ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. @NCPspeaks @PawarSpeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 11, 2022
तसेच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू. असा निर्धारही जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepali Sayed : “ज्यांची हयात रस्त्यावर सभा घेऊन वाहतुकीचा…”, दिपाली सय्यद यांची मनसेवर टीका
- Sanjay Raut : कायदेशीररित्या आमची बाजू भक्कम, आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे – संजय राऊत
- Sanjay Raut | राज्यात बेकायदेशीर सरकार प्रस्थपित करण्याचा प्रयत्न – संजय राऊत
- ENG vs IND : विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत रोहित शर्मा म्हणतो, ‘‘तो लवकरच…”
- Arvind Sawant : “न्यायाला उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षित नाही”; कोर्टाच्या निर्णयावर अरविंद सावंत नाराज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
