मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफने ऋषभ पंतच्या इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) धडाकेबाज खेळीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आसिफने इंग्लंडच्या गोलंदाजांवर टीका केली असून त्यांनी पंतला योग्य गोलंदाजी केली नाही आणि म्हणूनच पंतने एवढे मोठे शतक झळकावल्याचे सांगितले. आसिफच्या म्हणण्यानुसार पंतने असे काही विशेष केले नाही.
ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात धडाकेबाज शतक झळकावले. त्याने केवळ १११ चेंडूत २० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १४६ धावा केल्या आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. मात्र, ऋषभ पंतने काहीही मोठे केले नाही, असे मोहम्मद आसिफला वाटते. त्याच्या मते, इंग्लंडच्या गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली आणि त्यामुळेच पंतला धावा करता आल्या.
ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आसिफ म्हणाला, ”पंतने काही मोठे केले नाही पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली. पंतमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्याचा डावा हात काम करत नाही पण तरीही त्याने शतक झळकावले. याचे कारण म्हणजे इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांच्या कमकुवत भागात गोलंदाजी केली नाही आणि त्यामुळेच ते मोठे डाव खेळू शकले. जडेजा आणि पंत फलंदाजी करत असताना इंग्लंडने लेफ्ट आर्म स्पिनर लावला जो योग्य नव्हता. मी पंतच्या विरोधात नाही पण जेव्हा विरोधी संघ अशी चूक करतो तेव्हा तुम्हाला धावा करण्याची संधी मिळते. या सामन्यात इंग्लंडकडून अनेक चुका झाल्या.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

