Share

Aaditya Thackeray : “आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलं तसं ऐकलं असतं तर…” ; आदित्य ठाकरे यांचा टोला

Published On: 

मुंबई : आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवडणुक नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने पार पडली. यामध्ये शिंदे फडणवीस सरकारकडून भाजपचे राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे राजन साळवी हे मैदानात होते. या लढाईत भाजपच्या राहुल नार्वेकर यांचा १६४ मतांनी विजय झाला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. यानंतर अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या शुभेच्छांच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. “एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात येऊन सांगितले असते तर मीच उद्धव ठाकरे यांची बोलून मुख्यमंत्री बनवले असते” असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार म्हणाले की, “फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं”.

अजित पवारांच्या या टोल्या नंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. “अजित दादा जर तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय आमच्या कानात येऊन सांगा” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर खोचक टीका केली.

सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना कानात सांगायला पाहिजे होते असं सांगितलं. आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलं तसं ऐकलं असतं तर ही  परिस्थिती अडीच वर्षांपूर्वी दिसली असती. असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. “आजचे उपमुख्यमंत्री हे एवढे हुशार आहेत की त्यांनी राहुल नार्वेकरांना वर बसवले आहे. कारण त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जवळीक नको अशी कुरबुर होती. म्हणून ज्यांची राष्ट्रवादीसोबत जास्त जवळीक आहे त्यांनाच वर बसवले आहे” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!