Share

ENG vs IND : रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह! खेळू शकतो टी-२० मालिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रोहित शर्माबाबत टीम इंडियाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रोहितचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. इंग्‍लंड विरुद्धच्‍या पाचव्या कसोटीतून (ENG vs IND) रोहित शर्मा बाहेर आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. बीसीसीआयने नुकतीच टी-२० आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली. रोहित शर्माकडे दोन्ही संघांची कमान देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तो इंग्लंडविरुद्ध ७ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचा भाग बनू शकतो. आयपीएल २०२२ पासून तो आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही.

लीस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा फलंदाजीला आला. मात्र त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याने सामन्यातून बाहेर पडला होता. पाचवी कसोटी ५ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे विराट कोहलीसह ५ वरिष्ठ खेळाडूंना टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

पहिल्या टी-२० सामन्यासाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जॅस्पीनो बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि उमरान मलिक.

वनडे मालिकेसाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रणंद कृष्णा, मोहम्मद शमी, शमी मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!