Share

Ajit Pawar : “एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं तर…”, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवडणुक नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने पार पडली. यामध्ये शिंदे फडणवीस सरकारकडून भाजपचे राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे राजन साळवी हे मैदानात होते. या लढाईत भाजपच्या राहुल नार्वेकर यांचा १६४ मतांच्या आकड्यामुळे विजय झाला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. यानंतर अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या शुभेच्छांच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात येऊन सांगितले असते तर मीच उद्धव ठाकरे यांची बोलून मुख्यमंत्री बनवले असते असा टोला यावेळी अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार म्हणाले की,”एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं. फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं”.

शेवटी विधानसभेला अध्यक्ष मिळाले
नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल यांच्यातील वादामुळे हे पद रिक्तच राहिले होते. त्यानंतर बऱ्याच महिन्यांनी आता विधानसभेला अध्यक्ष मिळाले आहेत. १६४ मतांसह भाजपचे राहुल नार्वेकर हे नवे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत. राहुल नार्वेकर हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते पहिल्यांदा शिवसेना या पक्षात होते. तसेच ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय ही मानले जात होते. त्यानंतर त्यांनी मतभेदांमुळे शिवसेना पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल नार्वेकर हे कुलाबा मधून आमदार म्हणून निवडून आले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!