Share

ENG vs IND : बुमराह..बुमराह! भारताला नवा कॅप्टन मिळाल्यानंतर पुन्हा व्हायरल होतोय ‘तो’ VIDEO!

Published On: 

मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात मागील वर्षी रद्द झालेली कसोटी आजपासून खेळवली जात आहे. या कसोटीत बेन स्टोक्स इंग्लंडचे तर जसप्रीत बुमराह भारताचे नेतृत्व करत आहे. स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा बुमराह हा ३६वा खेळाडू ठरला आहे. बुमराहला मोठा मान मिळाल्यानंतर सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत एक छोटा चाहता बुमराहला चिअर करताना दिसत आहे. बुमराहच्या या चाहत्याने त्याच्या चिअरिंग स्टाइलने सर्वांची मने जिंकली आहेत. २०२० मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीसमोर भारतीय फलंदाज एकही सामना खेळू शकले नाहीत आणि संघाला ९ गडी गमावून केवळ ३६ धावा करता आल्या. भारताची कसोटी क्रिकेटमधील एका डावातील ही सर्वात नीचांकी धावसंख्या होती. या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी बुमराहच्या या चाहत्याने आपल्या चिअरिंग स्टाइलने सर्वांना खूश केले होते.

भारत-इंग्लंड प्लेइंग इलेव्हन –

भारत – शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (कर्णधार).

इंग्लंड – अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.

महत्त्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!