Share

Royal London Cup : काऊंटी क्रिकेट खेळणार कृणाल पंड्या! ‘या’ संघात होणार सामील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्यानेही काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रुणालने रॉयल लंडन कप (Royal London Cup)च्या आगामी हंगामासाठी वॉर्विकशायर काऊंटी क्रिकेट क्लबशी करार केला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कृणालने याबद्दल आनंद व्यक्त केला.

”एजबॅस्टन येथे खेळण्यास उत्सुक आहे”, असे कृणालने सांगितले. वॉर्विकशायर २ ते २३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या रॉयल लंडन कप स्पर्धेच्या आगामी २०२२ हंगामात ८ ग्रुप स्टेज सामने खेळणार आहे. ३१ वर्षीय कृणाल पंड्याने भारतासाठी आतापर्यंत १९ टी-२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने १३० धावा केल्या आहेत, तर १९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२४ धावा केल्या आहेत आणि १५ बळी घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यातही त्याच्या नावावर ५ विकेट्स आहेत.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये कृणाल पंड्याने ७६ सामन्यांमध्ये ३७च्या सरासरीने ८९ विकेट घेतल्या आहेत आणि २२३१ धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक (२६ चेंडू) केले. क्रुणाल म्हणाला, ”काऊंटी क्रिकेट खेळण्याची आणि वॉर्विकशायरसारख्या ऐतिहासिक क्लबमध्ये सामील होण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. एजबॅस्टनला क्रिकेटमध्ये विशेष स्थान आहे आणि मी तिथे खेळण्यासाठी उत्साही आहे. मी माझ्या नवीन सहकाऱ्यांना भेटण्यास उत्सुक आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!