Share

ENG vs IND : जस्सी जैसा कोई नही..! बॅटिंगपाठोपाठ बुमराहनं बॉलिंगमध्येही मोडला जुना रेकॉर्ड

Published On: 

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहची कामगिरी कायम आहे. पहिल्या डावात चमकदार कामगिरी करतानाच गोलंदाजी करतानाही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने ६८ धावांत ३ बळी घेतले. त्याने इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून यजमानांना दडपणाखाली आणले. यासह जसप्रीत बुमराहने गोलंदाजीचा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

जसप्रीत बुमराहच्या नावावर आता या कसोटी मालिकेत एकूण २१ बळी आहेत. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत बुमराहने आतापर्यंत २१ बळी घेतले आहेत. यासह, तो इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. बुमराहने २०१४मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १९ बळी घेणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला.

या यादीत तिसरे नाव आहे माजी अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खानचे. २००७ मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने १८ विकेट घेतल्या होत्या. इशांत शर्मा १८ विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. २०१८च्या मालिकेत त्याने हा पराक्रम केला होता. लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांनी १९५९ मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत १७ बळी घेतले होते.

याआधी जसप्रीत बुमराहने आपल्या फलंदाजीत मोठा विक्रम केला होता. त्याने स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध एकाच षटकात २९ धावा ठोकत इतिहास रचला. बुमराह आता कसोटी सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या षटकात एकूण ३५ धावा आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!