Share

Alka Kubal : “कितीही मोठे झालात तरी…”,अलका कुबल यांनी सांगितली अशोक सराफ यांची खास आठवण

Published On: 

मुंबई : अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला देखील पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी सर्व चित्रपटसृष्टी आज एकत्र येणार आहे. यानिमित्ताने ‘बहुरंगी अशोक’ हा कार्यक्रम प्रदर्शित केला आहे. या निमित्ताने अभिनेत्री अलका कुबल यांनी अशोक सराफ यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बहुरंगी अशोक या कार्यक्रमाच्या निमित्ताने अलका कुबल यांनी काही किस्से सांगितले आहेत. त्या म्हणाल्या, “अशोक मामा हे खरोखरच सुपरस्टार होते आणि आहेत. मी मामांसोबत ‘तुझ्यावाचून करमेना’ हा चित्रपट केला. तो माझा आणि त्यांचा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी मला पहिला पुरस्कार मिळाला. याचे श्रेय मामांचे आहे.”

https://www.instagram.com/tv/Cfinv-HoYOf/?igshid=YmMyMTA2M2Y=

पुढे त्या म्हणाल्या, “या चित्रपटात मला अनेक दृष्यात काय बोलायचं? काय नाही? आपण त्यात काय जागा काढू शकतो, डायलॉग कसे बोलायला हवे हे सगळे मामांमुळेच समजले. माझं विद्यापीठ हे मामा आहेत. त्यांनी कायम जमिनीवर कसं राहावं हे मला शिकवलं” बहुरूपी अशोक हा कार्यक्रम झी मराठीवर प्रदर्शित झाला आहे . या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!