Share

Eknath Shinde : आपण शिवसैनिक आहोत, जिथे लाथ मारू तिथून पाणी काढू – एकनाथ शिंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडला व तो बहुमताने जिंकला. या ठरावात १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले तर ९९ आमदारांनी या सरकारच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे-भाजप सरकार या ठरावात विजयी झाल्याचे घोषित केले. यानंतर सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाषण केले. भाषणादरम्यान त्यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर टीकाही केली.

‘मला पाठिंबा देणारे आमदार विचारायचे, साहेब आपल्याला कोणता झेंडा मिळेल आपल्याला कोणता चिन्ह मिळेल. हे त्यांना सांगितलं आपण सगळे शिवसैनिक आहोत जिथे लाथ मारू तिथे पाणी काढू’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘अनेक आमदार यायचे आणि म्हणायचे आपली नैसर्गिक युती भाजपासोबत आहे. यानंतर मी ५ वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. याला दीपक केसरकर साक्षीदार आहेत. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नाही. अजित पवार यांनी माझ्या खात्याच्या बैठका घेतल्या तरी मी त्यांना काही बोललो नाही. त्यांनी ८०० कोटी रुपये घेतले तरी मी काही बोललो नाही. मात्र, तुम्ही समांतर नगरविकास खात्याचा प्रमुख का केला?’ असा सवालही यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला.

‘अजित पवार म्हणाले पुढच्यावेळी बंडखोर आमदार निवडून येणार नाहीत. मात्र, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. भाजपासोबत आम्ही पुढील विधानसभा निवडणुकीत २०० आमदार निवडून आणू’. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान मागील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर टीकाटिप्पणी देखील केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!