मुंबई : भारतीय महिला संघाने पल्लेकेले येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा (INDW vs SLW) १० गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेच्या संघाने प्रथम खेळताना केवळ १७३ धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून स्मृती मानधनाच्या ९४ आणि शफाली वर्माच्या ७१ धावांच्या जोरावर भारताने २६व्या षटकात एकही विकेट न गमावता विजय मिळवला. ४ विकेट्स घेतल्याबद्दल रेणुका सिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
नाणेफेक हरल्यानंतर श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या ११ धावांवर त्यांच्या तीन विकेट पडल्या. कर्णधार चमारी अटापट्टू (२७) आणि अनुष्का संजीवनी (२५) यांनी संघाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु हे दोघेही बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव पुन्हा डळमळला. अमा कांचनाने ४७ धावांची नाबाद खेळी खेळून संघाला १७०च्या पुढे नेले. त्याच्याशिवाय निलाक्षी डी सिल्वाने ३२ धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंगशिवाय मेघना सिंग आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी २ गडी बाद केले.
Renuka Singh scalped 4⃣ wickets & bagged the Player of the Match award as #TeamIndia won the second #SLvIND ODI. ???? ????
Scorecard ???? https://t.co/XOkhAjSAUt pic.twitter.com/YxWvZ212ed
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022
लक्ष्याला प्रत्युत्तर देताना स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी १७४ धावांची सुरेख भागीदारी करत संघाला १४६ चेंडू राखून एकतर्फी विजय मिळवून दिला. स्मृती मानधनाने ८३ चेंडूंत ११ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या तर शफाली वर्माने ७१ चेंडूंत ४ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७१ धावा केल्या.
वनडे मालिकेतील तिसरा सामना ७ जुलै रोजी पल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे. याआधी भारताने श्रीलंकेचा तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ने पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

