Share

Aditya Thackeray : विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला आदित्य ठाकरेंची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यानंतर सभागृहात बोलताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनेक मुद्दे उपस्थित केलं.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधी अनेक नेत्यांनी सभागृहात भाषण केली. तसेच आज सभागृहाचं कामकाज चालू असताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले. तसेच गंमतीशीर किस्से देखील आज सभागृहात पहायला मिळाले. मात्र हे सर्व सुरु असताना दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना गायब होते. ते यावेळी सभागृहात अनुपस्थित होते. यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क सुरु झाले आहेत.

दरम्यान, आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक देखील झाले. माझी दोन मुलं डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघे साहेबांनी आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं. माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता होती. दिघे साहेब पाच, सहावेळा माझ्या घरी आलं. मी संघटनेला न्याय देऊ शकत नाही म्हणून सांगितलं. तेव्हा दिघे साहेब म्हणाले तुला हे दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसावेच लागतील. मी दिघे साहेबांना देव मानतो, बाळासाहेब, दिघेसाहेब आमचे देव मानतो. असं बोलताना शिंदे भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!