🕒 1 min read
मुंबई : शिंदे-भाजप सरकारने आज बहुमताचा प्रस्ताव 164 मते मिळवत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 99 मते मिळाली. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः तुफान फटकेबाजी केली. यानंतर या सर्व घडामोडींवर आज शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
काल विधान भवनातून बाहेर पडताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याचदरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत असताना अचानक त्यांच्या हातातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समोरचा माईक काढून घेतला. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला.
काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना… काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेने आयोजित केली होती. या महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
