Share

Milind Gawli : “ज्यांच्या आयुष्यामध्ये वारी घडली नाही त्यांच्या…”, आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची ‘ती’ इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आई कुठे काय करते ही स्टार प्रवाहवरील मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देत असतात. मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. नुकतंच मिलिंद गवळी यांनी पंढरीच्या वारीबद्दलचा एक अनुभव सांगितला आहे. याबद्दल त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट खूप चर्चेत आहे.

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या ‘विठ्ठल विठ्ठल’ या चित्रपटातील एक छोटी व्हिडीओ क्लिप शेअर केली आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “आषाढी एकादशी आता जवळ येत आहे. जवळजवळ 21 वर्षापूर्वी “विठ्ठल विठ्ठल “ सिनेमाच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर माझी वारी झाली होती. एक विलक्षण वेगळा अनुभव माझ्या गाठीशी बांधून मी माझ्या आयुष्याचा प्रवास करतो आहे . पांडुरंगाच्या वारीला जाणं हा एक वेगळाच अनुभव आहे , ज्यांनी कोणी वारी केली आहे त्यांनाच तो माहितीये , ज्यांच्या आयुष्यामध्ये वारी घडली नाही त्यांच्या आयुष्यात काहीतरी खूप मोलाचा राहून गेलेलं आहे ! काही दिवसापासून पांडुरंगाच्या वारीच्या वारकऱ्यांच्या बातम्या कानावर पडत आहे, छान पाऊस सुरू झाला आहे , “विठ्ठल विठ्ठल “सिनेमा मेकिंगच व्हिडीओ फुटेज मला मिळालं.

सहा सात जुलै 2003 , आळंदी पासून शूटिंग करत करत पंढरपूर पर्यंत आम्ही चाललो होतो. गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शित रिफ्लेक्शन मयुर शहा निर्मित वृंदा अहिरे, मिताली जगताप, श्वेता लंडनचे प्यारी शिवपुरी आणि अलकाताई कुबल, प्रसाद ओक व शरद पोंक्षे पाहुणे कलाकार. सगळ्यांसाठीच हा सिनेमा वेगळा अनुभव देऊन गेला. शासनाचे 2 बक्षीस, एवरेस्ट कडे येथे राइट्स आहेत, आता गेली अडीच तीन वर्ष आई कुठे काय करते “ मधल्या अनिरुद्ध देशमुख माझ्या या भूमिकेला बायकांनी असंच शिव्या दिल्या आणि देत आहेत ,अजूनही देतायेत. अशावेळेला “विठ्ठल विठ्ठल “या सिनेमातल्या भूमिकेचा अनुभव खूप आवर्जून आठवतो.

तो अनुभव असा आहे , मी एक साधू संन्याशाच्या वेशात पंढरपुरामध्ये बसलो होतो , शूटिंग सुरू व्हायला थोडा अवकाश होता आणि तीन चार बायका माझ्यासमोर येऊन बसल्या, एका वयस्कर बाईन माझ्या पायावर डोकं ठेवलं , आणि मला म्हणाली “बाबा माझ्या आयुष्याच सार्थक झालेला आहे ,दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत ,मुलगा रांके ला लागलेला आहे ,आता बाबा तुम्ही मला आशीर्वाद द्या ,म्हणजे मी शांतपणे डोळे मिटू शकेन “,मी त्या बाईंना म्हणालो “आजी जात्या विठ्ठलाच्या पाया पड माझ्या नको, मी एक कलाकारे आणि हा साधू चा रोल करतोय “

त्या बाई म्हणाल्या “नाही बाळा ,तूच मला आशीर्वाद दे ,कारण मला दिसतो ना विठ्ठल तुझ्या मध्ये“ कलाकारच आयुष्य किती वेगळ आणि सुंदर आहे बघा ,एका बाजूला अनिरुद्ध देशमुखला एक बाई चपलेने मारेन असं म्हणते आणि “विठ्ठल विठ्ठल “या भूमिकेसाठी एका बाईला माझ्यामध्येच विठ्ठल दिसतो ,पांडुरंग दिसतो. विलक्षण नाही का हे सगळं !विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!, असे त्यांनी ही पोस्ट करताना म्हटले आहे. मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/Cfk_OZmqrLv/

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!