🕒 1 min read
मुंबई : जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंड संघाने एजबॅस्टन कसोटीत (ENG vs IND) टीम इंडियाचा ७ विकेट्स राखून पराभव केला. यासह बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील यजमानांनी कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. इंग्लंडने चौथ्या डावात अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ३७८ धावा करत विक्रमी लक्ष्य गाठले. इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयासाठी ११९ धावांची गरज होती. रुट-बेअरस्टोच्या स्फोटक खेळीने इंग्लंडने उपाहारापूर्वी खेळ संपवला. चौथ्या डावात जो रूटने १९ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १४२ आणि जॉनी बेअरस्टोने १५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ११४ धावा केल्या.
भारतीय संघाने १५ वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी गमावली. यापूर्वी २००७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका १-० अशी जिंकली होती. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया किमान कसोटी ड्रॉ करेल, असे मानले जात होते, पण इंग्लंडच्या आक्रमक खेळासमोर टीम इंडियाला ते जमले नाही.
RECORD BREAKERS!! ????????????
???????????????????????????? #ENGvIND ???????? pic.twitter.com/P6Y7kFqsCc
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
This team. This way of playing. Simply irresistible ❤️
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
???????????????????????????? #ENGvIND ???????? pic.twitter.com/Phl1BNkGol
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
इंग्लंडचा स्फोटक खेळाडू जॉनी बेअरस्टोने आपल्या कारकिर्दीतील १२वी कसोटी खेळी केली. एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावातही बेअरस्टोने संघासाठी १०६ धावा केल्या होत्या. भारताविरुद्धच्या दोन्ही डावांत शतके झळकावणारा बेअरस्टो हा इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे. इंग्लंडच्या संघाने १४५ वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. इंग्लंडच्या संघाने भारताविरुद्धच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग केला. याआधी २०१९ मध्ये लीड्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी ३५९ धावा करून विजय मिळवला होता.
संक्षिप्त धावफलक –
- नाणेफेक – इंग्लंड (गोलंदाजी)
- भारत पहिला डाव – सर्वबाद ४१६ (ऋषभ पंत १४६ धावा, रवींद्र जडेजा १०४ धावा, जेम्स अँडरसन ६०/५)
- इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद २८४ (जॉनी बेअरस्टो १०६ धावा)
- भारत दुसरा डाव – सर्वबाद २४५ (चेतेश्वर पुजारा ६६, ऋषभ पंत ५७, बेन स्टोक्स ३३/४)
- इंग्लंड दुसरा डाव – ७६.४ षटकात ३ बाद ३७८ (जो रूट नाबाद १४२, जॉनी बेअरस्टो नाबाद ११४. जसप्रीत बुमराह ७४/२)
- निकाल – इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
