मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर अजूनही राज्यात रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. शिवसेनेतून बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. यानंतर महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने अनेकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. मात्र याबाबत आता फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला आहे.
याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या कि, आपल्याला आधीपासूनच माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाहीत. उलट मला याबाबत मला गर्व वाटत होता. त्यांनी त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात, असं अमृता म्हणाल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे अचानक झालेलं बंड नव्हतं. तर ते खूप दिवसांपासून सूर असलेल्या प्लॅनींग होत. अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. याचा खुलासा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आपल्या भाषणात बोलताना केला होता. यानंतर आता अमृता फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर हि चित्र अधिक स्पष्ट होणार दिसतायत.
महत्वाच्या बातम्या


