🕒 1 min read
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने अनेकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे अचानक झालेलं बंड नव्हतं. तर ते खूप दिवसांपासून सूर असलेल्या प्लॅनींग होत. अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. याचा खुलासा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आपल्या भाषणात बोलताना केला होता. यानंतर याबाबत आता देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला आहे.
विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठे खुलासे करत जोरदार फटकेबाजी केली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांसोबत गाठीभेटी व्हायच्या. कुणी उठायच्या आत आम्ही आपापल्या घरी असायचो. आम्ही कधी भेटायचो हे आमच्या लोकांना सुद्धा कळत नव्हतं, असं त्यांनी सांगितलं होत. त्यांच्या या विधाना अमृता फडणवीसा यांनी दुजोरा दिला आहे. देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातला की ते मलाही ओळखू यायचे नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना अमृताजी असं ही म्हणाल्या कि, मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाहीत. उलट मला याबाबत मला गर्व वाटत होता. त्यांनी त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात, असं अमृता म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
