मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून होती. नगरपंचायती निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात, अशी मागणी राज्यातील नेत्यांकडून केली जात होती. त्यानंतर आता सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
निवडणूक आयोगाने आज राज्यातील 1,166 ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमधील ग्रामपंतायतींसाठी निवडणूकीची घोषणा केली आहे. या 1,166 ग्रामपंतायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर लगेच 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्यात सत्तासंघर्ष पहायला मिळत असताना ग्रामपंचायती निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता सर्व पक्ष पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरताना दिसतील. राज्य सरकारने सरपंच निवडीबाबत काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे.
राज्यातील 82 तालुक्यातील सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होईल. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. शिवसेनेचे दोन्ही गट यावेळी पहिल्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसून येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
- Navneet Rana | पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी माझा कॉल रेकॉर्ड केला – नवनीत राणा
- Chandrasekhar Bawankule | “…अन् 5 कोटी मिळवा”; चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट ऑफरच दिली
- Chandrashekhar Bawankule | मजबुत भारत बनविण्याच्या स्वप्नाला बारामतीकर नक्कीच साथ देतील – चंद्रशेखर बावनकुळे
- BJP-MANSE | भाजप मनसे युती होणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट
- Sudhir Mungantiwar । …म्हणून शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच हक्क; मुनगंटीवारांनी सांगितलं नेमकं कारण
- Udayanraje Bhosale | उदयनराजे सातारकरांना सॉरी म्हणाले कारण…


