सातारा : सातारा नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. यावेळी खासदार उदयनराजेंनी जोरदार फटकेबाजी करत निशाणा साधला. माझ्यावर पैसे खाल्ल्यांचा आरोप केला जात असताना मी पैसे खाल्ले असते तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवलं असत का? 5 रुपये फोकस करून दाखवलं असतं. मी गैर करत नाही आणि गैर खपवून घेत नाही कोणीपण असुदे.. तुम्ही ठिकाण निवडा जर मी पैसे खाल्ले हे सिद्ध झाले तर अजिंक्यताऱ्याच्या कडेलोटवर जाऊन मी उडी मारेन नाहीतर ज्यांनी आरोप केलेत त्यांनी उडी मारावी असे आवाहन खासदार उदयनराजेंनी दिले.
सातारा नगर पालिकेची हद्दवाढ लक्षात घेता आणि पालिकेच्या सध्या असलेली इमारतीची दयनीय अवस्था झाली असल्याने नवीन इमारत 9 मजली करण्यात येणार आहे. पालिकेला ही जागा बाबा कल्याणी यांनी विनामूल्य दिली आहे. माझ्या विरोधात भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात त्यांनी थोडीतरी जनाची नाही मनाची लाज बाळगली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Lanke| बारामतीने देशाला विकासाची दिशा दाखवली – निलेश लंके
- Aditya Thackeray | “शिवसेनेला संपवायला निघालेला एक एक चेहरा आता पुढे येतोय”
- Shivsena । धनुष्यबाण गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारणं; तसा प्रयत्न केल्यास….; खैरेंचा शिंदेंना इशारा
- Ambadas Danave | “शिंदे गटालाच सरन्यायाधीशांनी ‘Who are you’ विचारलंय”
- “धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर…”, दसरा मेळाव्या वादात बच्चू कडूंची उडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

