Share

Chandrasekhar Bawankule | “…अन् 5 कोटी मिळवा”; चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट ऑफरच दिली

Published On: 

बारामती : राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेते जोमात कामाला लागल्याचं दिसून येतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी राज्यातील ग्रामीण भागात भाजपचं कमळ फुलवण्याचा निर्धार केलाय. त्याचबरोबर राष्ट्रवादीला शह देण्यासाठी वेगवेगळ्या योजना देखील भाजपकडून आखल्या जात आहेत. अशातच आता बारामतीतील महत्त्वाची मानली जाणारी माळेगाव नगरपंचायत भाजपच्या ताब्यात असावी, अशी महत्त्वकांक्षा भाजप नेते बाळगून आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले…

माळेगाव नगरपंचायत भाजपच्या झेंड्याखाली आणायची आहे. त्यादृष्टीने येथील नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले. ज्या दिवशी ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात येईल, त्याच दिवशी राज्याच्या तिजोरीतून पाच कोटींचा विकास निधी माळेगावला दिला जाईल, असं आश्वासन देखील बावनकुळे यांनी यावेळी दिलं.

नगरपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेची सर्वजण प्रतिक्षा करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंनी माळेगावात बुथ कमिटीतील कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही ऑफर दिली.

देशात पंतप्रधान मोदीसाहेबांचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे. त्यात आता महराष्ट्रात देखील भाजपचं सरकार आलं आहे. यापुढील काळातील लोकसभा निवडणूक असो किंवा माळेगावसारख्या नगरपंचायती, महानगरपालिकांच्या निवडणूका आपल्याला जिंकायच्या आहेत, असं म्हणत कार्यकर्त्यांच्यात स्पुर्ती जागवण्याचा प्रयत्न बावनकुळे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!