Share

Chandrashekhar Bawankule | मजबुत भारत बनविण्याच्या स्वप्नाला बारामतीकर नक्कीच साथ देतील – चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

पुणे : चंद्रशेखर बावनकुळे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याव आले होते. यावेळी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सर्व निवडणुका आमच्यासाठी प्राधान्य क्रमाच्या आहेत. असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. यावेळी बावनकुळे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन काम करत आहेत. त्यांना खुप जनसमर्थन मिळत आहे. असं ते म्हणाले.

बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे! असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्याला आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जितेंद्र आव्हाडांना जे बोलयाचं आहे ते बोलू द्या. 2024 ला बघू निवडणुका होतील त्यावेळेस बघू कुणाच्या पायाखालची वाळू सरकते. कोण उध्वस्त होतंय हे कळेलच की. असं बावनकुळे म्हणाले आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर साथ देतील, असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!