Share

Uddhav Thackeray | “शिवसेनेचं नाव, चिन्ह गोठवलं, तरी पळालात!”, उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

Published On: 

Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षावर एकनाथ शिंदे यांनी दावा केल्यामुळे नेमकी शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय निवडणूक आयोग देणार असून निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. यामागे भाजप (BJP) पक्षाचं षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अशातच अंधेरी पूर्व पोट निवडणुकीवरुन देखील राजकरण तापलं होता. अशातच अंधेरी पोट निवडणुकीत भाजप (BJP) पक्षाने माघार घेतली. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप पक्षावर सडकून टीका केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा भाजप पक्षावर घणाघात –

बुलडाणा वरुन आलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा, शिवसेना संपवायची या हेतूने सगळं करण्यात आलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी मशाल घेऊन आपण पुढे जात आहोत. धनुष्यबाण रामाचा होता, त्या धनुष्यबाणाच्या मदतीनेच रावणाचा वध रामाने केला असं म्हणत आता अन्यायाला जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आपल्याकडे आहे, ती घेऊन पुढे जात काम करू, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पहिल्यात निवडणुकीत मशालीची ताकद दिसली असून अंधेरीत पराभव दिसला म्हणून भाजपने माघार घेतली, असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यांना शिवसेना संपवायची होती. पण शिवसेना एक अंगार आहे. ती कधीच संपणार नाही. जिथे अंधार असेल तिथे आपली मशाल जाईल, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!