Share

BJP-MANSE | भाजप मनसे युती होणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट

Published On: 

राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आधीपासूनच भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीची जोरदार (MNS and BJP alliance) चर्चा रंगली आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप मनसे युती वर महत्त्वाचं वक्तव्य केलंय. राज ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासंदर्भात आज कुठलीही चर्चा नाही, जसे जसे दिवस पुढे जातील तशी तशी चर्चा होईल, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलं आहे.

भाजप मनसे युती होणार?

पक्ष संघटना मजबूत करणे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना विरोध करणे असा होत नाही, असंं ते म्हणाले. एकनाथ शिंदेंचे उमेदवार असेल तर त्याला संपूर्ण ताकद आणि पाठबळ देण्याचे काम भाजप करेल, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली. तसंच, मनसेसोबत युतीवरही भाष्य केलं.

मनसे भाजप युती संदर्भात देखील बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं. जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते देशाला अन्न वस्त्र निवारा देऊ शकले नाही, आता शेवटचे घरघर लागली तर भारत जोडो आंदोलन करतात त्याचा काही उपयोग होणार नाही, असं म्हणत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.

‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा फक्त एक गट असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, असं म्हणत त्यांनी भाजपची रणनिती स्पष्ट केली आहे.

‘राज्यातील जनतेकडून वसूल केली जाणारी वीज दरवाढ हे महाविकास आघाडी सरकारचा पाप आहे, आम्ही राज्य सोलोरायझेशन करण्याच्या प्रयत्न करत आहोत. त्यानंतर वीजदर नियंत्रणात येतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!