अमरावती : अमरावती मध्ये काल एका 19 वर्षीय युवतींचे अपहरण केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला, या प्रकरणामध्ये सोहेल शहा नावाच्या युवकला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलेले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना कॉल केला असता तो कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला.
त्यावरून राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्यावर नवनीत राणा चांगल्याच भडकल्या, मी मागासवर्गीय असल्याने माझा कॉल रेकॉर्ड केला असा आरोप करत ठाणेदार मनीष ठाकरे यांचा फोन हिसकावून घेतला. त्यावेळी पोलीस व नवनीत राणा यांच्यामध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. गेल्या दहा दिवसात ली ही पाचवी घटना असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला व पोलीस तातड़ीने कारवाई करत नसल्याचा आरोप राणा यांनी केला. दरम्यान राणा यांनी मुलीच्या आईला आपल्या घरी सोबत नेले. आणि दोन तासा मध्ये मुलीला आणावे असा अल्टीमेट खा. नवनीत राणा यांनी विक्रम साळी यांना दिले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | मजबुत भारत बनविण्याच्या स्वप्नाला बारामतीकर नक्कीच साथ देतील – चंद्रशेखर बावनकुळे
- BJP-MANSE | भाजप मनसे युती होणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट
- Sudhir Mungantiwar । …म्हणून शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच हक्क; मुनगंटीवारांनी सांगितलं नेमकं कारण
- Udayanraje Bhosale | उदयनराजे सातारकरांना सॉरी म्हणाले कारण…
- Devendra Fadnavis | आमच्या सोबत आहे ती खरी शिवसेना आहे – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

