🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडला व तो बहुमताने जिंकला. या ठरावात १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले तर ९९ आमदारांनी या सरकारच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे-भाजप सरकार या ठरावात विजयी झाल्याचे घोषित केले.
१५ दिवस चाललेल्या या राजकीय नाट्यामध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या. शिवसेनेतील आमदारांनी बंडक केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतली. यादरम्यान आज विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊक झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी बोलताना ‘मी पक्षासाठी जीवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले’ असेही म्हटले.
शिंदे-भाजप सरकारने आज विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे झाली. या भाषणांद्वारे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी केली. महाविकास आघाडीतील आमदारांनी तर एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर जसा टिकेचा पाऊसच पडला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. या भाषणादरम्यान मुख्यमंत्री शिंदे भावुक झाले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वाईट प्रसंगांची आठवण करून दिली. ‘मी पक्षासाठी जीवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले. पक्षाच्या कामामुळे मी कधीही कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही सतत पक्षाच्या कार्यात व्यस्त राहायचो. मी कधीही कोणत्याही पदासाठी लोभ धरला नाही.’ असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
